पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीवरुन राजकारण तापलं
Continues below advertisement
राज्य सरकारने ज्या दिवशी पुण्यातील कोथरूडच्या सरकारी शिवस्रुष्टीला पन्नास एकर जागा मंजूर केली त्याच दिवशी बाबासाहेब पुरंदरेंच्या कात्रजमधील शिवस्रुष्टीलाही मान्यता दिली. त्यामुळे राज्य सरकारला नक्की काय करायचंय असा प्रश्न विचारला जाऊं लागलाय. राज्य सरकारच्या बदललेल्या पर्यटन विकास धोरणामुळे एकीकडे पुरंदरेंच्या शिवस्रुष्टीच काम जोरात सुरु झालंय तर सरकारी शिवस्रुष्टीसाठी निवडलेल्या बीडीपी आरक्षण असलेल्या जागेला अतिक्रमणांचा विऴखा पडलाय.
Continues below advertisement