ABP News

Jayakumar Rawal | छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही : जयकुमार रावल | ABP Majha

Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अष्टावधानी राजा...त्यांनी उभं केलेलं स्वराज्य, त्यांचा ऐतिहासिक ठेवा आज गडकिल्ल्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे. महाराष्ट्रात एकूण 353 किल्ले आहेत. त्यातले काही किल्ले छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेत. त्यातल्या काही ऐतिहासिक वास्तू आणि किल्ले पर्यटनाच्या विकासासाठी दिले जाणार आहेत. जास्तीत जास्त 90 वर्षाच्या करारानं. पण यामुळे किल्ल्याचं पावित्र्य धोक्यात येईल असं म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवलीय. त्यानंतर पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपतींच्या किल्ल्यांना हात लावणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram