Uttam Bandu Tupe | 'माझा'चा पाठपुरावा, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपेंना हक्काचं घर | ABP Majha
जेष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांची गरिबी आणि वार्धक्यामुळे झालेली हलाखीची परिस्थिती 'एबीपी माझा'ने काही महिन्यांपूर्वी सर्वांसमोर आणली होती. त्यानंतर तुपेंना मदत करण्यासाठी अनेक संस्था आणि लोक पुढे आले. पुण्यातील ज्या वाकडेवाडी भागातील झोपडीवझा घरात बंडू तुपेंच सगळं आयुष्य गेलं त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी घर बांधून देण्याच ठरलं आहे. या घराच बांधकाम पूर्ण झालं असून हे घर आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उत्तम बंडू तुपेंना सोपवण्यात आलं. पक्षाघाताने तुपे पती-पत्नी दोघेही बोलू शकत नाहीत. पण आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना दखल घेतली गेल्याने तुपे पती-पत्नींचा चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचं दिसत होतं.