पुणे | हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं पुण्यातल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंदळकर यांच्या निधनाने भारतीय कुस्तीवर शोककळा पसरली आहे. वयोमानामुळे गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेलं जायचं. मात्र आज अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. कोल्हापूरला उद्या त्यांचं पार्थिव नेलं जाईल आणि अंत्यसंस्कार होतील.