Pune Rains | पावसामुळे कात्रजच्या ओढ्यात पाणी, वसाहतीत पाणी शिरलं | ABP Majha
Continues below advertisement
कात्रज परिसरातील नवीन वसाहत येथील ओढा भरुन वाहू लागला आहे. त्या ओढ्याचं पाणी वसाहतीत शिरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहर आणि परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी शिरलं आहे. शहरातील येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी-आझादनगर, बी टी कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड येथे घरांमध्येही पाणी शिरलं. या भागात अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं आहे.
Continues below advertisement