पुणे : माणसांपेक्षा वाहनं जास्त, लोकसंख्या 35 लाख, गाड्या 36 लाख!
पुणे शहराच्या वाहनवाढीचा वेग राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. सुमारे 35 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात तब्बल 36 लाखांपेक्षा जास्त वाहने असल्याचं निष्पण्ण झालं आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी वाहनांची आकडेवारी जाहीर केली.