पुणे : डीएसके प्रकरणातील सरकारी वकील बदलले

Continues below advertisement
डीएसके प्रकरणी नेमण्यात आलेले सरकारी वकील बदलले आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील गैरहजर होते. त्यांच्या जागी उज्ज्वला पवार या दुसऱ्या वकील हजर होत्या.  डीएसके प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.  आवश्यक ती कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यामुळे मराठे यांना जामीन देण्यात यावा, असं सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. दरम्यान, मराठे यांच्या जामीन अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार असं सांगितलं आहे. मराठे यांना जामीन देण्यास आमची काहीही हरकत नसल्याचं पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram