पुणे : पैशाची मागणी करणाऱ्या प्रेयसीची गळा आवळून हत्या, दोन आरोपी अटकेत
Continues below advertisement
ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करणाऱ्या प्रेयसीचा खून झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. आणि नंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचं उघडकीस आलं आहे. वारजे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत .विपुल भवरलाल शहा याला अटक करण्यात आली आहे. मयत तरुणी मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. वारजे पोलीस ठाण्यात याप्रकरणी मिसींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रेरणा कांबळे असं खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.
Continues below advertisement