पुणे : मिलिंद एकबोटेंना शिरुर कोर्टाचा दणका, कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी
Continues below advertisement
कोरेगाव भिमा प्रकरणात सध्या अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांना शिरुर न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. शिरुर कोर्टानं एकबोटे यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिक्रापूरमध्ये एकबोटेंवर कोरेगाव - भिमा हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरील सुनावणी दरम्यान आज शिरुर कोर्टानं त्यांना ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे कोर्टात सुनावणी होणार आहे. त्याकडेही सर्वाचं लक्ष लागून आहे.
Continues below advertisement