मुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणी सुधीर ढवळेंसह 5 जणांना अटक
Continues below advertisement
एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना गोवंडीतील त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी त्यांचा घराची झाडाझडती घेतली होती आणि आज त्यांना अटक करण्यात आली.
एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांनी उपस्थिती लावली होती. या नक्षलवाद्यांचा आयोजकांशी संबंध आहे, असा आरोप ठेवून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
ढवळे यांच्यासोबत आणखी चार जणांना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आले आहे. नागपुरातून वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन यांना अटक करण्यात आली आहे. तर माओवाद्यांचा नेता रोना विल्सन याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.