पुणे महापालिकेच्या रामटेकडी परिसरातील कचरा प्रकल्पाला भीषण आग
पुण्यात हडपसरच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागली आहे. हडपसरमधल्या रोकेम कचरा प्रकल्पाला ही आग लागलीय. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. घटनास्थळी धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.