पुणे : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर दुसरं काहीही होऊ देणार नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा
Continues below advertisement
पुण्यातील एम्प्रेस गार्डनवरुन राजकारण आता चांगलच तापलं आहे. या जागी गार्डनशिवाय दुसरं काहीही होऊ देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. तसेच यासंदर्भात जिल्हाधिऱ्यांसोबतही बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एम्प्रेस गार्डनच्या जागेवर शासकीय निवासस्थान बांधण्याचा सरकारच्या निर्णयाला आता विरोध होत आहे. त्याचबरोबर खासगी कंपनीच्या गाण्यात मुख्यमंत्र्यांनी काम करणं योग्य आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
Continues below advertisement