पुणे : शनिवार वाड्यात होणारी 'एल्गार परिषद' वादाच्या भोवऱ्यात
पुण्याच्या शनिवार वाड्यावर आज होणाऱ्या एल्गार परिषदेला समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी विरोध दर्शवला आहे. या एल्गार परिषदेला गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी हजर राहणार आहेत. पण शनिवारवाड्यावर नियमानुसार फक्त सांस्कृतिक कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. मेवानींना आमंत्रित करुन हा कार्यक्रम राजकीय होऊ शकतो. कार्यक्रमत राजकीय वक्तव्य होऊ शकतात. त्यामुळे एकबोटेंनी याला विरोध करत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन दिलं आहे. तसंच योग्य कृती केली नाही, तर याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. हिंदू आघाडीच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी देखील हा कार्यक्रम शनिवारवाड्यावर घेण्यास विरोध केला आहे. तर कार्यक्रम होणारच यावर एल्गार परिषद ठाम आहे.