पुणे : अखेर महावितरणला जाग, ट्रान्सफॉर्मर दुर्घटनेत जखमी मुलाला 20 हजाराची मदत

Continues below advertisement
पुण्यातील कोंढवा परिसरात ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट होऊन मुलगा गंभीर झाल्यानंतर महावितरणाला अखेर जाग आली आहे...
महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अखेर आज घटनास्थळाची भेट घेतली, तसंच लवकरात लवकर डीपीला सुरक्षा बसवू असं आश्वासनंही दिलं...
याशिवाय ट्रान्सफॉर्मरच्या ब्लास्टमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाला २० हजारांची रक्कम मदत म्हणून देण्यात आली आहे. मात्र या मुलाच्या उपचारासाठी अधिक खर्च येणार असल्यानं मुलाच्या आईनं अधिक मदतीची मागणी केली आहे.
काल कोंढवामध्ये ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट झाल्यानं १२ वर्षीय अबू शेख हा मुलगा गंभीररित्या भाजला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram