पुणे : बँकेकडून डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव

Continues below advertisement
गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. घेतलेलं कर्ज परत न केल्यामुळे डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून लिलाव करण्यात येणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसकेंच्या पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव होणार आहे. या बंगल्याची बेस प्राईस 66 कोटी 39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बँकेकडून या लिलावाची पेपरला जाहिरात देण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram