पुणे : डीएसकेंच्या जामीनावर आज सुनावणी
Continues below advertisement
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. सध्या कुलकर्णी दाम्पत्य येरवडा तुरुंगात आहे. त्यांना आज शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर केलं जाईल, त्यानंतर कोर्ट त्यांना पुन्हा कोठडी देतं की तुरुंगवास भोगावा लागतो हे पाहणं महत्वाचं आहे. मालमत्ता विकून ठेवीदांरांचे पैसे द्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला जामीन द्यावा अशी मागणी डीएसकेंनी केली आहे. ठेवीदारांचे पैसे थकवल्याचा डीएसकेंवर आऱोप आहे.
Continues below advertisement