पुणे : डीएसकेंच्या मालमत्ता लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात
Continues below advertisement
आर्थिक कोंडीत सापडलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या, मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरु केलीय... याचसंबंधात आज डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं होतं... यावेळी डीएसके आणि त्यांच्या पत्नीची पोलिसांकडून दोन तास चौकशी झाल्याची माहिती मिळतीय... डीएसकेंच्या तीनशेपेक्षा जास्त मालमत्तांचा अहवाल पुणे पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय... जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा अहवाल राज्य सरकारसमोर सादर केला जाईल... आणि राज्यसरकारने जर परवानगी दिली तर त्यानंतर डीएसकेंच्या मालमत्तांचा लिलाव केला जाईल... मात्र या मालमत्तांवर बँकांचं कर्ज असल्याने गुंतवणूकदारांची देणी भागवली जातील का? हा प्रश्नच आहे...
Continues below advertisement