पुणे : डीएसके प्रकरणात अटकेट असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे रुग्णालयात
Continues below advertisement
डीएसके प्रकरणात अटकेची कारवाई झालेले बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना छातीत दुखू लागल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नियम डावलून डीएसके समुहाला कर्ज दिल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने काल दुपारी बँक ऑफ महाराष्ट्राच्या चार बड्या अधिकाऱ्यांसह इतर दोन जणांना अटक केली होती. दरम्यान अटक झाल्यानंतर रवींद्र मराठे यांना काल रात्री छातीत दुखू लागल्यानं ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. न्यायालयाने मराठे यांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Continues below advertisement