पुणे : डी एस कुलकर्णी यांच्या मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2018 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने निगडीमधून अनुराधा पुरंदरेंना बेड्या ठोकल्या. डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत अनुराधा पुरंदरेंची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात अनुराधा पुरंदरेंचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे.