पुणे : कोठडीत पडल्याने डीएसकेंच्या डोक्याला इजा, ससूनमध्ये उपचार सुरु
पोलीस कोठडीत पडल्याने प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके जखमी झाले आहेत. डोक्याला मार लागल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांना काल शनिवारी पहाटे दिल्लीमधून अटक केल्यानंतर, त्यांना पुण्याच्या सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी सत्र न्यायालयाने त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.