पुणे : चेक बाऊन्स होताना बँकेने का सांगितलं नाही? डीएसकेंच्या गुंतवणूकदारांचा सवाल
डीएसके प्रकरणात डीएसकेंच्या वतीनं दिले जाणारे चेक बाऊंस होत असतानाही बँकेनं ही बाब लपवून ठेवल्याचं उघड झालं आहे. बँकेनं आर्थिक परिस्थिती गुंतवणुकदारांना सांगितलं असती तरी अनेकांचं नुकसान टळलं असतं असं गुंतवणुकदारांचं म्हणणं आहे. त्यामुळं आज पुण्यात डीएसकेंच्या गुंतवणूकदारांकडून बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं.या बैठकीत गुंतवणूकदारांनी त्यांची एक समिती स्थापन करुन न्यायालयात स्वतंत्र वकील देण्याचा निर्णय घेतलाय.