Maharashtra SSC Result 2019 | दहावी बोर्डाचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल | ABP Majha
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 77.10 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12.31 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस कॉन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण संपादित केलेल्या गुणांच्या माहितीची प्रिंटआऊट काढता येईल. गुणपडताळणी आणि छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध होणार आहे. गेल्या पाच वर्षांमधील यंदा दहावीचा सगळ्यात कमी निकाल लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार हे पहिलंच वर्ष होतं. त्यामुळे कमी निकाल लागू शकतो, असं शकुंतला काळे म्हणाल्या. याआधी 2007 मध्ये 78 टक्के निकाल लागला होता. त्यानंतर यावर्षी एवढा कमी निकाल लागला आहे.