Jai Shri Ram | जय श्रीराम म्हणा! नाहीतर..., पुण्यातील डॉक्टरला धक्कादायक अनुभव | ABP Majha

Continues below advertisement
हरियाणात जय श्रीराम म्हणण्यास नकार दिल्यानंतर एका मुस्लिम तरुणाला झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच तिकडे राजधानी दिल्लीतही एका डॉक्टरला असाच अनुभव आलाय. पुण्यातील नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण गद्रे एका व्य़ाख्यानासाठी दिल्लीत होते. सकाळी मार्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यावर काही तरुणांनी त्यांना घेरलं आणि जय श्रीराम म्हणण्यास बजावलं. अचानक घडलेल्या या प्रकारानं गद्रे काही क्षण गोंधळले पण त्यांनी जय क्षीराम म्हणताच त्या तरुणांनी तिथून काढता पाय घेतला. पण, गुरुग्रामच्या घटनेनंतर दिल्लीत असा प्रकार होणं ही चिंतेची बाब आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram