पुणे : जुन्नरजवळ बिबट्यावर कुत्र्यांचा हल्ला, बिबट्या गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी गावात एक बिबट्या जखमी अवस्थेत आढळला आहे. बिबट्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. मात्र वनविभागानं गावकऱ्यांचा हा दावा फेटाळून लावलाय. बिबट्याच्या डाव्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या बिबट्यावर जुन्नरच्या निवार केंद्रात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.