Flood Update | कोल्हापूर आणि सांगलीतल्या ओसरणाऱ्या पुराविषयी नेमकी माहिती काय? | ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापूर आणि सांगलीतला पूर आता हळूहळू ओसरू लागला आहे... मात्र आता तिथल्या नागरिकांसमोर आणि सरकारी यंत्रणांसमोर वेगवगेळी आव्हानं आ वासून उभी आहेत... घराघरात चिखलचं दिसतोय. त्यामुळं रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.. तसंच पुराच्या पाण्यात संसार वाहून गेल्यानं, पुनर्वसनाचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. अनेक दुकानात पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. तर पुराच्या पाण्यानं अनेकांच्या घरातलं अन्न-धान्य भिजलंय. खाण्यासाठी दाणा उरला नाही आहे. पिण्यासाठी पुरेसं पाणी नाही आहे.. आणि अशा अवस्थेत पुन्हा एकदा संसार नव्यानं उभा करायचा आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त यांनी कोल्हापूर आणि सांगलीतल्या ओसरणाऱ्या पुराविषयी नेमकी काय माहिती सांगितलीय. तसंच आतापर्यंतच्या बचावकार्यादरम्यान त्यांनी काय अपडेट्स दिलेत, पाहुयात