पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मैदानावरील एका भागातच शूटिंग : नागराज मंजुळे
समस्त मराठी जनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रसिद्ध सिनेदिग्ददर्शक नागराज मुंजळे आता स्वत:च्या हिंमतीवर हिंदी चित्रपटसृष्ठीत मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याच्या याच कामात खोडा घालून नागराजला अडचणीत आणण्याचं काम काही जणांकडून सुरु आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना आगामी हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट उभारण्यासाठी मैदान भाड्याने दिलं. यासाठी नागराज मंजूळेनं विद्यापीठाला ६ लाख भाडेही दिले आहेत.