पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अडचणीत वाढ
Continues below advertisement
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. कारण अटकपूर्व जामीनावरील सुनावणीसाठी दीपक मानकर यांना उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या खंडपीठानंही नकार दिला आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. याआधी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांनी सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळं मानकरांना आता पुन्हा नव्या खंडपीठासमोर याचिका सादर करावी लागेल.
Continues below advertisement