पुणे : तंत्रमंत्राने उपचार करणारा डॉ. सतीश चव्हाण अटकेत
Continues below advertisement
मांत्रिकाला बोलावून रुग्णावर मंत्रोपचार करण्याऱ्या पुण्याच्या डॉ. सतीश चव्हाण यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ. चव्हाण यांनी संध्या सोनावणे या २४ वर्षीय महिलेवर उपचारासाठी मांत्रिकाला पाचारण केलं होतं. मांत्रिकाने आपल्या गंडादोराच्या सहाय्याने तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संध्या सोनावणे हिचा मृत्यू झाला.
Continues below advertisement