पुणे : धानोरीमध्ये पोलिसांची मुख्याध्यापकासह शिक्षकाला मारहाण
Continues below advertisement
पुण्यात अनधिकृत बांधकामाच्या कारवाईवरुन मुख्याध्यापक आणि शिक्षकाला पोलिसांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. धानोरी येथील मुंजाबा वस्ती प्रगती इंग्लिश मीडियम शाळेत हा प्रकार घडला. शाळेत उभारलेल्या अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. कारवाईपूर्वी विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ देण्याची मागणी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केली. त्यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या महापालिका अतिक्रमण विभागाच्या महिला पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांना मारहाण केली. ही घटना शाळेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Continues below advertisement