पुणे : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर समाज आक्रमक

मराठा समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असताना, आता धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालाय. ५ ऑगस्टला पुण्यात धनगर समाज आरक्षण कृती समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी माजी आमदार- खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलंय. या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाची दिशा ठरणार आहे. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola