पुणे : गोळ्या झाडून बिल्डर देवेंद्र शहा यांची हत्या
पुणे : पुण्यात प्रभात रोडवर बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. देवेंद्र शहा असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर शहा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.