पुणे : अखेर मिलिंद एकबोटे यांना अटक

Continues below advertisement
भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना घरी जाऊन अटक केली.

काही वेळापूर्वीच सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी एकबोटेंना अटक केली.

यापूर्वी हायकोर्टानेही एकबोटेंचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यामुळे एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता होती.

राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. या अहवालावरुन सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram