पुणे : आरोप सिद्ध न केल्यास प्रकाश आंबेडकरांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा : गजानन एकबोटे
भिमा-कोरेगाव इथे झालेल्या हिंसाचारानंतर संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. या हिंसाचारामागे या दोघांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबडेकर यांनी केला होता. प्रकाश आंबेडकर यांनी सात दिवसांत हे आरोप सिद्ध करावेत नाहीतर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करण्यात येईल असं मिलिंद एकबोटे यांचे मोठे भाऊ गजानन एकबोटे यांनी सांगितलं.