पुणे: दीपक मानकर अद्यापही गायब, गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना सापडेनात
जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पुणे राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांचा शोध लागलेला नाहीये. मानकर यांच्या पुण्यातील दोन्ही घरांमध्येही पोलिसांनी शोध घेतला, मात्र मानकर यांचा कुठेच पत्ता लागत नाहीये. तसंच मानकर यांचा फोनही आऊट ऑफ कव्हरेज येतोय. त्यामुळे घरांची झडती घेऊनही मानकरांचा थांगपत्ता लावण्यात पुणे पोलिसांना अपयश आलंय..