पुणे : आर्य मूळ भारतीय, हरियाणातील संशोधनावरुन डेक्कन कॉलेजचा दावा
Continues below advertisement
आर्य समाज हा मूळचा कुठला.... गेल्या अनेक शतकांपासून पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचा दावा पुण्याच्या डेक्कन कॉलेजनं केला आहे. आर्य हे मूळचे भारतीयच असल्याचा दावा डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी केला आहे. तसंच ते इराण किंवा तुर्कस्तानातून आल्याचा दावाही चुकीचा असल्याचं डेक्कन कॉलेजनं म्हटलं आहे. हरियाणातील राखीगडीत गेल्या काही वर्षांपासून उत्खनन आणि संशोधन सुरु आहे. या संशोधनासाठी जगप्रसिद्ध हॉवर्ड विद्यापीठाची मदत घेतली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. डेक्कन कॉलेजनं केलेल्या दाव्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही हे वारंवार सांगण्यात आलं आहे.
Continues below advertisement