पुणे : अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात फळांची आरास
अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातल्या गणपती मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळतीय. मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात गणपती दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली. तिथे रात्री १२ वाजेपासून पूजा सुरु झाली, तर रात्री ३ वाजून ३० मिनिटांनी गणेशाची आरती करण्यात आली. तर तिकडे पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात फळांची आरास करण्यात आली. पहाटे 3 वाजल्यापासून दगडूशेठ मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.