पुणे : डीएसकेंना पुन्हा ससूनमध्ये हलवण्यात येणार, रिपोर्ट सामान्य आल्यास पुन्हा कोठडीत रवानगी

Continues below advertisement
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसकेंना आज दिनानाथ मंगशेकर रुग्णालयातून ससून रुग्णालयात हलवलं जाणार आहे. याठिकाणी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या होतील, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णलयात ठेवायचं की नाही, याचा निर्णय होणार आहे.
तसंच त्यांचे रिपोर्ट सामान्य आल्यास, त्यांना पुन्हा पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणीही केली जाणार आहे. गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंना कोठडी सुनावणी गेलीय. मात्र कोठडीत येताच ते पाय घसरुन पडल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram