पुणे : न्यायालयाच्या देखरेखीखाली मालमत्तांची विक्री व्हावी, डीएसकेंची मागणी
Continues below advertisement
मालमत्तांची विक्री न्यायालयाच्या निगराणीखाली करण्यात यावी, अशी मागणी, पुण्यातले बांधकाम उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी केली आहे. उद्या डीएसके यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालय़ात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डीएसके एबीपी माझाशी बोलत होते.
समाज माध्यमांमध्ये होत असलेल्या निराधार बदनामीमुळे आपल्या मालमत्ता विकण्यास अडथळे येत असल्याची खंत डीएसकेंनी व्यक्त केली. शिवाय काही जणांच्या टोळक्यांनी आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखल्याचा आरोपही कुलकर्णी यांनी केला.
त्यामुळे न्यायालयानेच एका चार्टर्ड अकाऊंटंटची नेमणूक करुन मालमत्ता विक्री करण्यास मदत करण्याची मागणी डीएसकेंनी केली आहे.