पुणे : 30 मिनिटांसाठी 1 रुपया, पुण्यात सायकल शेअरिंग योजना सुरु
पुण्यात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठात आजपासून सार्वजनिक सायकल शेअरिंग योजना सुरू करण्यात आली. या योजनेचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. औंध परिसरात 200 आणि सावित्री बाई फुले विद्यापीठात 100 सायकल प्रायोगिक तत्वावर आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत.