स्पेशल रिपोर्ट : पुणे : पाळीव प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्मशानभूमी
पुण्यामध्ये प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्राण्यांची स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पाळीव प्राण्यांचे मृतदेहपुरायचे कुठे असा प्रश्न उद्धभवतो. यासाठी पुणे महापालिकेनं नायडू मलनिस्सारण केंद्राच्या आवारात ८० लाख रूपयांचा निधी खर्च करून स्मशानभूमी बांधली आहे. अशाप्रकारे प्राण्यांसाठी स्मशानभूमी असणारी पुणे पोलिका ही देशातील पहिलीच पालिका असल्याचा दावा पुणे महापालिकेनं केलाय. ३ फूटांखाली उंची असणाऱ्या प्राण्यांचे मृतदेह या स्मशानभूमीत दहन करता येणार आहे. हे स्मशानभूमीचं काम पूर्ण झालं असून थोड्याच दिवसात ती सुरु होणार आहे.