पुणे: गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता येणार: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे
Continues below advertisement
भाजपचे राज्यसभेचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. गुजरातमध्ये भाजपची नाही, तर काँग्रेसची सत्ता येईल, असं भाकीत संजय काकडे यांनी केलंय. आपल्या टीमने गुजरातमध्ये सर्वे केला असून, तिथं भाजपची सत्ता जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. गुजरातची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाही, तर भावनिक मुद्द्यांवर लढवली गेली असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
Continues below advertisement