पुणे : लाभार्थी जाहिरातीवर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं चोख प्रत्युत्तर
लाभार्थी जाहिरातीवर टीका करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते सरकारी योजनेचे लाभार्थ होते, त्यामुळं त्यांनी फोटो छापून जाहीरात केली नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. दौंड तालुक्यातल्या भिमा पाटस सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या 25 हजाराच्या प्रोत्साहनपर रकमेत वाढ करण्यात येईल. असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय.