पुणे : सतीश शेट्टी हत्याप्रकरणी मुख्य आरोपी वीरेंद्र म्हैसकरला क्लीनचिट
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येप्रकरणी सीबीआयनं मुख्य आरोपीला क्लीन चिट दिली आहे. आयआरबीचे प्रमुख वीरेंद्र म्हैसकरांविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नसल्याचं स्पष्टीकरण सीबीआयनं कोर्टात दिलं आहे. त्यामुळे न्यायालयात खटला सुरु असतानाच सीबीआयनं म्हैसकरांना निर्दोष जाहीर केलं आहे.