पुणे : 35 लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात 36 लाख वाहनं
Continues below advertisement
पुणे शहराचा वाहनवाढीचा वेग राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक असल्याचं समोर आलंय. सुमारे ३५ लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात ३६ लाखांपेक्षा जास्त वाहने असल्याचं निष्पण्ण झालंय. प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी वाहनांची आकडेवारी जाहीर केली आहे. लोकसंख्येपेक्षाही वाहनांची संख्या जास्त असल्याने आधीच प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या पुण्याची अवस्था यापेक्षाही भयानक होण्याची चिन्हे आहेत. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. शहरात वाहनांची संख्या वेगाने वाढत असल्याचं आरटीओच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे.
Continues below advertisement