पुणे : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय 15 ऑक्टोबरपूर्वी : चंद्रकांतदादा पाटील

Continues below advertisement
पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करण्याबाबत 15 ऑक्टोबरपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलं. आज पुण्यात वारकऱ्यांनी चंद्रकांतदादांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सध्या मंदिर समितीवर असलेले अतुल भोसले हे वारकरी नाहीत, त्यामुळे त्यांची नियुक्ती अयोग्य असल्याचा दावा वारकऱ्यांचा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात समिती बरखास्त न झाल्यास 28 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही वारकऱ्यांनी दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram