पुणे : मराठा क्रांतीच्या बंददरम्यान चाकणमध्ये मोठं नुकसान
पुण्यातल्या चाकणमध्ये सोमवारी मराठा आंदोलनाच्या बंद दरम्यान जाळपोळीप्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे चाकणमधली जाळपोळ ही स्थानिकांनी नव्हे तर बाहेरुन आलेल्या लोकांनी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. असंख्य बसेस आणि खासगी वाहनांची काल तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.