पुणे: चाकणमध्ये गाड्यांची तोडफोड करणारे नेमके कोण?

पुण्यातल्या चाकणमध्ये काल बंद दरम्यान तोडफोड करणारे नेमके कोण होते, हा प्रश्न आता पुढे येतोय.. कारण, स्थानिकांनी नव्हे तर बाहेरच्या लोकांनी येऊन चाकणमध्ये तोडफोड केली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ग्रामीण भागातुन आलेला जमाव, औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी आलेले कामगार आणि चौक भागातील झोपडपट्ट्यांमधील काही टोळक्यांकडून हिंसाचार झाला असण्याची शक्यता आहे. दरम्यान, जाळपोळीप्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटल्यानंतर अटकसत्र सुरु होणार आहे. काल चाकणमद्ये मराठा मोर्चाच्या बंद दरम्यान
असंख्य वाहनांची तोडफोड करण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola