पुणे : पुरंदरेंच्या शिवसृष्टीला केंद्र सरकारकडून पाच कोटींची मदत
Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनमानसात पोहचवण्यासाठी हयात घालवणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न पूर्ण होतंय. त्यांच्या प्रयत्नातून पुण्याजवळच्या कात्रजमध्ये शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. या शिवसृष्टीला आज केंद्र सरकारकडून ५ कोटींची मदत दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ५ कोटींचा धनादेश बाबासाहेबांना सुपुर्द केला जाईल. १९९९ साली युती सरकारच्या काळात शिवसृष्टी उभारण्यासाठी कात्रजजवळच्या आंबेगाव गावात २१ एकर जागा देण्यात आली होती. प्रत्यक्षात २००६ साली या कामाला सुरुवात करण्यात आली. शिवसृष्टीच्या या कामासाठी ३०२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या २ वर्षांमध्ये संपूर्ण शिवसृष्टी उभा करण्याचा ट्रस्टचा मानस आहे.
Continues below advertisement