पुणे : मांजरांची व्यवस्थित काळजी न घेतल्यानं दोन महिलांवर गुन्हा
घरात पाळलेल्या तब्बल 29 माजरांची व्यवस्थित काळजी न घेतल्यानं पुण्यात 2 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्याच्या कोंढव्यातील ब्रह्मा होरायझन या उच्चभ्रू सोसाटीत ही घटना घडली आहे. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर दीपिका कपूर आणि संगीता कपूर या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एका फ्लॅटमध्ये 29 मांजरांना कोंडून ठेवण्यात आलं. मात्र त्या मांजरांची कोणतीही काळजी न घेतल्यानं पोलिसांनी आरोपी महिलांवर गुन्हा दाखल केलाय, तसंच 29 मांजरंही ताब्यात घेतली आहेत.