पुणे: कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर
पुणे: पर्वती भागात मुळा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत फुटल्यानं पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली आहे.